अलीकडच्या काळात अवैद्य धंदे राजेरोसपणे सुरु आहेत. या धंद्यांवर कारवाईसाठी वेळोवेळी कारवाई देखील व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत राहते. ट्रेडींग लायसेन्स नसलेल्या स्टोन क्रशर सील करण्याच्या जम्बो कारवाई नंतर हातकणंगले तहसीलदारांनी आज अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर कारवाई करत ही वाहने ताब्यात घेतली आहेत. टोप परिसरातील शिये-फाटा परिसरामध्ये हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी स्वतः जाऊन अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात कारवाई केली.
या कारवाईदरम्यान परवाना न घेता गौणखनिज वाहतूक करणारे तीन डंपर तहसीलदारांनी ताब्यात घेतले. सदर वाहने हातकणंगले तहसीलदार कार्यालयात शिरोली मंडळ अधिकारी सीमा मोरये, टोप तलाठी सुनील बाजारी, कोतवाल रणजीत कांबळे यांनी पंचनामा करून ताब्यात घेतली. या वाहनांबाबत महसूल विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार कार्यालयामार्फत सांगण्यात आले.