अलीकडे अनेक भागात भरगोस निधी मंजूर केले जात आहेत. ज्यामुळे विकासकामाना चालना मिळत आहे.
सुभेदार मल्हारराव होळकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी ५०० कोटींचा निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. धनगर समाजाच्या समस्या व मागासलेपण लक्षात घेता, या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र आणि स्वायत्त अशा संस्थेची स्थापना आवश्यक आहे.
समाजातील समस्या व प्रश्नांचे कालसुसंगत संशोधन करण्यासाठी, स्थलांतराच्या समस्येचे निराकरण, सांस्कृतिक आणि भाषिक धोरणे, धनगर आणि भटक्या-विमुक्त जमातींमधील आत्मसन्मानासाठी व सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी सुभेदार मल्हारराव होळकर संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करून ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली.
