सांगलीतील तरूणाच्या खूनाचे आरोपी जेरबंद!

आर्थिक कारणातून सांगलीतील तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सांगलीतील दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील एक जण पसार झाला आहे.नोकरी लावण्याच्या बहाण्याने पैसे घेतले होते.

तरूणाने पैसे परत मागत धमकी दिल्याने मारेकर्‍यांनी त्‍याचा काटा काढल्‍याचा प्रकार समोर आला आहे. नितेश वराळे आणि सुरज जाधव (राहणार गावभाग सांगली) अशी अटक केलेल्‍यांची नावे आहेत. संशयीत आरोपींनी गुन्ह्य कबूल केला आहे.