हातकणंगले तालुक्याच्या राजकारणात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणार मोठी राजकीय घडामोड….

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलतानाचे चित्र सर्वानींच पाहिलेले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहे. अनेकांनी स्वबळाचा नारा हाती घेतलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील राजकारणात येणाऱ्या काळात समीकरणे बदलण्याचे संकेत आहेत.

माजी खासदार राजू शेट्टी यांची उरलीसुरली स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी खासदार धैर्यशील माने यांनी फोडली. स्वाभिमानीचा ताकदवान नेता राजेश पाटील शिवसेना पक्षात दाखल झाला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण माजी सभापती सौ. पद्माराणी पाटील यांचे पती हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील यांनी अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकला. पाटील यांच्या गळ्यात शिवसेनेचा भगवा स्कार्फ घालून त्यांचा पक्ष प्रवेश करवून घेतला. खासदार धैर्यशील माने यांनी हे राजकारण घडविले. यावेळी विभागातील काही नेते उपस्थित होते.

खास. धैर्यशील माने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांनी या विभागात आणखीन काही राजकीय टार्गेट निश्चित केले आहे. कदाचित फेब्रुवारी महिन्यात मोठे बाळसे शिवसेनेला प्राप्त होणार आहे. दरम्यान, गुरुवारच्या या राजकारणामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या गडाला मोठे भगदाड पडले, असे लोक म्हणाले दरम्यान, खास माने म्हणाले, फेब्रुवारी महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम आणि कर्तृत्व पाहून मोठ्या संख्येने शिवसेनेत लोक सामील होणार आहेत.

हातकणंगले तालुक्याच्या राजकारणात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे. गुरुवारी या पार्श्वभूमीवर ठाण्यात एक बैठक पार पडल्याची माहिती मिळत चालली आहे. त्याचे पडसाद पेठ वडगाव पालिका निवडणुकीवर उमटतील, अशी शक्यता आहे.