सध्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा खूपच गाजावाजा करत आहे. अनेक शाळांनी अगदी उत्कृष्ट कामगिरी देखील केलेली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा क्र २ सन २०२४-२५ या उपक्रमामध्ये जिल्हा परिषद प्राथ. शाळा तू.बु. मळा (शेटफळे) ता. आटपाडी जि सांगली या शाळेचा शेटफळे केंद्रामध्ये प्रथम क्रमांक आला. शेटफळे केंद्रातील १० शाळांमध्ये प्राथमिक (७ ते ५) गटामध्ये एकूण १५० गुणांपैकी १२८ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानिमित्त पंचायत समिती आटपाडी शिक्षण विभागामार्फत शाळेचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी आटपाडी खानापूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार श्री. सुहास (भैय्या) बाबर यांच्या पत्नी सौ. सानिया सुहास बाबर यांच्या हस्ते व सांगली जिल्हा बँकेचे संचालक मा. तानाजराव पाटील तसेच आटपाडी कृषी उत्पन्न चाजार समिनीचे सभापती मा. श्री. संतोष पुजारी, पं. स. आटपाडी चे गटविकास अधिकारी (वर्ग- १) श्री. डॉ. संदीप भंडारे तसेच तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. जगन्नाथ कोळपे साहेब, विस्तार अधिकारी श्री अशोक म्हेत्रे, शेटफळे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री तुकाराम कोकरे सह आदी शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व शिल्ड देवून शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन गायकवाड, उपशिक्षिका सौ. अंजली बडे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मी संपतराव गायकवाड यांनी सत्कार करण्यात आला. व शाळेचे असेच कौशल्य पुढे वाढवण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.