इचलकरंजीत पुन्हा अतिक्रमण मोहीमेस होणार सुरुवात

सध्या अनेक भागात वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आला. भागाभागात अतिक्रमणे असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. सध्या अलीकडे प्रत्येक भागात अतिक्रमण विरोधात मोहीमच सुरु झालेली आहे. इचलकरंजी शहरात सध्या अतिक्रमण खूपच वाढलेले दिसतच आहे. महापालिकेच्यावतीने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी वर्षभरापासून लेखी मागणी करूनही पोलीस बंदोबस्त मिळत नाही. त्यामुळे अतिक्रमण मोहीम रखडली असून मुख्य रस्त्यावर नवनवीन अतिक्रमणे वाढू लागली आहेत.

सध्या महापालिकेच्यावतीने आठवड्यातील तीन दिवस अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. पोलीस बंदोबस्त मिळताच अतिक्रमण मोहीमेस पुन्हा सुरुवात होणार आहे. इचलकरंजी महापालिकेच्यावतीने अतिक्रमण विरोधी मोहीम राबवत असताना काही ठिकाणी किरकोळ वादावादी ही झाल्या होत्या. कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्या इतपत काही जणांनी प्रयत्न केले होते. त्यावेळेस ही पोलीस बंदोबस्ताची मागणी करूनही पोलीस प्रशासनाने निवडणुकीचे कारण दाखवून बंदोबस्त देण्यास टाळाटाळ केली होती. काही गुंड प्रवृत्तीच्या व्यापायांनी कर्मचायांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही पोलिसांनी बंदोबस्त दिला नव्हता.