प्रत्येक भागात अनेक कार्यक्रमानिमित्त विविध सामाजिक उपक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. याला उत्स्फूर्त सहभाग देखील पहावयास मिळतो. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त कारखाना कार्यक्षेत्रातील मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी आज दि. २५ व उद्या २६ जानेवारी २०२५ रोजी पुरुष व महिलांच्या मानधन कुस्ती स्पर्धा (मॅटवर) आयोजित केली आहे.
ही स्पर्धा कारखान्याच्या राजारामबापू कुस्ती केंद्रात होणार आहेत. या स्पर्धेत कार्यक्षेत्रातील पुरुष व महिला मल्लांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी केले आहे. पुरुष गटात १४ वर्षाखालील मल्ल ४०, ४५ व ५० किलो गटात,१७ वर्षाखालील मल्ल ५५ व ६० किलो गटात,तर खुल्या गटातील मल्ल ६५,७०,७५,८०,८६,९२ व १२० किलो गटात खेळू शकतात.
तसेच महिला गटात १४ वर्षाखाली मल्ल ३५,४० व ४५ किलो गटात, १७ वर्षाखालील मल्ल ५० व ५५ किलो गटात, तर खुल्या गटातील मल्ल ६१, ६५, ७२ व ७६ किलो गटात खेळू शकतात. प्रत्येक गटा तील पहिल्या ३ मल्लांना आकर्षक रोख रक्कम बक्षीस दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाचा विजेता मल्ल मानधनास पात्र आहे. मात्र या मल्लास राजारामबापू कुस्ती केंद्रात राहणे बंधनकारक आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमाप्रमाणे या कुस्त्या खेळविल्या जाणार असून मल्लांनी स्पर्धेस येताना जन्माचा दाखला (बोनाफाईड), आधार कार्ड आणावे. दि. २५ रोजी सकाळी ९ ते १२ नांव नोंदणी करून वजने घेतली जाणार आहेत. पंच समितीचा निर्णय अंतिम राहील. ही स्पर्धा कारखाना कार्यक्षेत्रातील मल्लांच्यासाठी मर्यादीत आहे. स्पर्धेत सहभागी मल्लांनी गैर मार्ग, डोपिंग, अथवा गैरवर्तन केल्यास, तसेच दुखापतीस केंद्र जबाबदार राहणार नाही. प्रत्येक मल्लांने स्वतःच्या जबाबदारीवर स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे.
आज २५ रोजी दुपारी ३ वाजता स्पर्धेचा उदघाटन सोहळा होणार आहे. अधिक माहितीसाठी मो.क्रं ९८८१५५०७७० व मो.क्रं. ८६०००८६९५७ वर संपर्क करावा. कुस्त्यांच्या प्रेक्षणीय लढती पहाण्यासाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे कुस्ती प्रेमींना श्री. पाटील यांनी आवाहन केले आहे.