उद्या संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. सर्वत्र जय्यत तयारी देखील झालेली आहे. २६ जानेवारी पासून संविधान अंमलबजावणीचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता यावर आधारित आपल्या देशाला संविधान दिले. याची अंमलबजावणी होऊन ७५ वर्षे सुरू होत आहे. याच्या सन्मानार्थ संविधान सन्मान तिरंगा यात्रेस कोल्हापूर येथील ऐतिहासिक बिंदू चौकातून सुरुवात होणार आहे. ही संविधान सन्मान यात्रा २६ जानेवारी ते २५ नोव्हेंबर पर्यंत आयोजित केली आहे.
या यात्रेमध्ये ७५ संविधान प्रति वाटप व ७५ संविधान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सदरची यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व संविधान प्रेमी नागिरकांनी या संविधान सन्मान तिरंगा यात्रेमध्ये मोटारसायकल व तिरंगा झेंडा घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन या यात्रेचे निमंत्रक वैभव कांबळे यांनी केले आहे. यावेळी सुहास लाटवडेकर, रावसाहेब रेंदालळकर, हणमंत पाटील, प्रदीप पाटील, शकील मुजावर, संजय काळे, दिपक गायकवाड, प्रकाश कांबळे, अनिल कांबळे, शितल कांबळे, सुनिल कांबळे, सुनिल पोवार आदी उपस्थित होते.
