डोंगरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांचे उद्घाटन

अलीकडे नवनवीन विकासकामांचा धडाका सध्या सुरु आहे. अनेक भागात निधी देखील मंजूर केले जात आहेत. नागरिकांच्या अनेक विविध समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न देखील केला जात आहे. सामाजिक, शैक्षणिक तसेच अन्य विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न देखील केले जात आहेत. डोंगरवाडी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखाताई जाधव यांच्या विकासनिधीतून नव्याने मंजूर दोन शाळा खोल्यांच्या इमारतीचे उद्घाटन यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक व राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याचे युवा अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते फीत कापून झाले.

यावेळी जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूल बनणे आज काळाची गरज आहे. असे प्रतिपादन नाईक यांनी केले. विराज नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. सुरेखाताई जाधव म्हणाल्या, कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व गावात जिल्हा परिषद शाळांची कामे करून कामेरी व कार्वे गावाला मॉडल स्कूल करिता निधी आणण्यामध्ये आम्हाला यश आले. यावेळी एम. के खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी शहाजी पाटील, डोंगरवाडीच्या लोकनियुक्त सरपंच सीमाताई पाटील, एम. के. खोत, मुख्याध्यापक प्रल्हाद कांबळे, एकनाथ नांगरे, प्रताप ठोंबरे, उत्तम खोत, लहू नांगरे, दशरथ लबडे, संपत पेठकर, श्रीरंग कोपार्डे व ग्रामस्थ उपस्थित होते.