इस्लामपूर पालिकेकडून संकलित कराची वसुली पठाणी पद्धतीने सुरू आहे. अनेक मालमत्ताधारकांचे पाणीपट्टी बिल भरले असताना सुद्धा संकलित कराचे कारण पुढे करत नळ कनेक्शन बंद केले आहे. करवसुलीसाठी पाणी कनेक्शन बंद करणं उचित नाही. बंद केलेले कनेक्शन सत्वर सुरू करावेत. अन्यथा उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने कर विभागाला टाळे ठोकू, असा इशारा माजी नगरसेवक शकिल सय्यद यांनी दिला आहे. सय्यद म्हणाले, करवसुलीला आमचा विरोध नाही परंतु पाणीपट्टी भरली असताना मालमत्ता कराचे कारण पुढे करत हुकुमशाही पद्धतीने पाणी कनेक्शन बंद करणे हे मालमत्ता धारकावर अन्याय आहे.
तो कदापि खपवून घेणार नाही. संकलित कर वसुली करताना हिटलरशाही चालू देणार नाही. पालिका जनतेने जनतेसाठी निर्माण केलेली सार्वजनिक संस्था आहे. पालिका अॅक्टनुसार थकित कर वसुलीसाठी मालमत्ता धारकांना नोटीस, कायदेशीर जती नोटीस बजावा. विविध प्रकारे वसुलीसाठी नगरपालिका अॅक्टमधे तरतूद असताना मनमानी कारभार थांबवावा. अन्यथा कर विभागाला टाळे ठोक आंदोलन करत वसुली पथकाला काळे फासू, असा इशारा सय्यद यांनी दिला.