हातकणंगले येथे बेवारस मृतदेह आढळला

हातकणंगले येथील ओढवाच्या स्मशानभूमीजवळ बेवारस स्थितीत मृतदेह आढळला. तो पुरुष जातीचा असल्याचे कळाले. त्याचे वय किमान ४०, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची नाईट पॅन्ट व कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. शनिवारी सकाळी १०.३० च्या सुमारास मृतदेह आढळून आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु झाली. त्यामुळे धोंडीराम कोरवी यांनी याबाबतची माहिती हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, सदर मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम हातकणंगले पोलिसांनी सुरु केले आहे. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तातडीने हातकणंगले पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पो. नि. शरद मेगाणे यांनी केले आहे.