हेरले,दूध संस्थेतील अपहार सिद्ध झाल्याने चुकीच्या पद्धतीने लेखापरीक्षणाचा अहवाल सादर केल्या प्रकरणी प्रमाणित लेखापरीक्षकाकडून सहकारी संस्था दुग्ध च्या सहाय्यक निबंधकांकडून कारवाई करण्यात आली. चुकीचे लेखापरीक्षण केल्याप्रकरणी संबंधित लेखापरीक्षकाकडून आकारण्यात आलेले ६१ हजार रुपयांचे शुल्क वसूल करण्यात आले. मौजे वडगाव (ता. हातकणंगले ) येथील श्री कामधेनू सहकारी दूध व्यवसायिक संस्थेच्या सन २०२२ – २३ सालातील वार्षिक लेखा परीक्षणाचे हे शुल्क संस्थेला परत करण्यात आले.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, दुग्ध यांच्याकडे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने गणपती शिवराम चौगुले व सभासदांनी फेर लेखापरीक्षण करण्याची मागणी केली होती. शासनाच्या वतीने आर. जे. हंकारे यांनी संस्थेचे फेर लेखापरीक्षण केले. या शासकीय लेखा परीक्षणात संस्थेने सन २०२२ – २३ सालासाठी नेमलेले लेखापरीक्षक महादेव परीट यांच्या कामात त्रुटी सिद्ध झाल्या. शिवाय संस्थेमध्ये विविध विभागात आर्थिक अपहार झाल्याचा ठपका फेर लेखा परीक्षणात ठेवण्यात आला.
चुकीचा अहवाल सादर केल्याप्रकरणी लेखापरीक्षकाकडून ६१ हजार वसूल
