सध्या सरकारतर्फे अनेक योजना राबविल्या जात आहे. ज्यांचा पुरेपूर लाभ देखील शेतकरी, नागरिक घेत आहेत. ताकारी सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात प्रत्येकी सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रासाठी एक पाणी वापर संस्था स्थापन केली जात आहे. ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात ७३ पाणी वापर संस्थांची स्थापना केली आहे.यामधील ५३ संस्थांची निवडणूक प्रक्रिया झाली आहे. यापैकी आठ संस्थांकडे लाभक्षेत्र हस्तांतर प्रक्रिया झाली आहे. याशिवाय ३१ संस्थांची करारनामे प्रक्रिया झाली आहे. यामुळे योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतीचे भविष्य आता पाणी वापर संस्थांच्या हाती जाणार आहे.
ताकारी योजनेत कडेगाव, खानापूर, पलूस, तासगाव, मिरज आणि वाळवा तालुक्यातील ७१ गावे समाविष्ट आहेत. या योजनेचे लाभ क्षेत्र सुमारे २७ हजार ४३० हेक्टर क्षेत्र आहे. या लाभ क्षेत्राला वेळेत पाणी मिळावे, पाणीपट्टी वसुलीसह अन्य प्रश्न सोडवण्यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी पाटबंधारे विभागान पुढाकार घेतला आहे.त्यानुसार या सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात ७३ पाणी वापर संस्थांची स्थापनाही झाली आहे. यामधील ५३ संस्थांची निवडणूक प्रक्रिया झाली आहे. यापैकी आठ संस्थांकडे लाभक्षेत्र हस्तांतरण प्रक्रिया झाली आहे. याशिवाय ३१ संस्थांची करारनामे प्रक्रिया झाली आहे.