BOM Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, अर्ज कसा करायचा जाणून घ्या

बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत १७२ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊयात.

या भरती प्रक्रियेत जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, सिनिअर मॅनेजर आणि मॅनेजर या पदांचा समावेश आहे. तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करु इच्छित असाल तर तात्काळ अर्ज दाखल करा. कारण, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी आहे.

शैक्षणिक अर्हता काय?

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता आणि इतर माहितीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता

वयोमर्यादा किती?

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025 अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 22 वर्षे असावे तर कमाल वयोमर्यादा 55 वर्षे ठेवण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया कशी होणार?

या भरती प्रक्रियेच्या अंतर्गत उमेदवारांची अंतिम निवड थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. 100 पॉईंट्सपैकी सर्वसामान्य प्रवर्गातील उमेदवारांना कमीत कमी 50 पॉईंट्स आवश्यक आहेत. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी कमीत कमी 45 पॉईंट्स मिळवणे आवश्यक आहे.

  • अर्ज करण्यास सुरुवात – 29 जानेवारी 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2025