शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर स्मैक क्रिकेट टूर्नामेंटचे आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते शास्त्रीनगर ग्राउंडवर उद्घाटन करण्यात आले. स्मॅकचे चेअरमन राजू पाटील अध्यक्षस्थानी होते. स्नॅकचे संचालक नीरज झंवर यांच्या संकल्पनेतून त्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन घडवून आणले आहे, यावर्षी स्नॅकचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. स्पर्धेमध्ये १२ उद्योजक संघाने सहभाग घेतला आहे. स्पर्धेमधील सामने ७ षटकांचे असतील. अंतिम सामन्यासह १९ सामने खेळवले जाणार आहेत. सर्व सामन्यांचे यु-ट्युब वरून थेट प्रक्षेपण सुरू आहे.
यावेळी मुख्य प्रायोजक विजय पोवार, सह प्रायोजक विनय ठाकूर यांच्याबरोबर् स्मॅक चे ऑ. सेक्रेटरी शेखर कुसाळे, संचालक नीरज झंवर, सुरेश चौगुले, अतुल पाटील, रणजित जाधव, निमंत्रित सदस्य अजिंक्य तळेकर, भीमराव खाडे, उद्योजक रवी डोली, प्रकाश राठोड, शंतनू जाधव आदित्य जाधव, उदय साळोखे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, सीआयआय पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष अजय सप्रे, स्मॅक आयटीआयचे प्राचार्य प्रसन्न वरखेडकर, काका पाटील आदी उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन कमिटी सदस्य व उद्योजक अभिषेक झंवर, साहिल मोमीन, ओंकार भगत, अभिषेक सोनी, श्रीराम सुरवसे, कुणाल कट्टी, प्रेम शिंदे, हर्षवर्धन राठोड सुद्धा उपस्थित होते.