कोल्हापुरात थेट अभिकर्ता पदासाठी २९ डिसेंबरपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन!

टपाल जीवन विमाकरिता थेट अभिकर्तापदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्जासह २९ डिसेंबरपूर्वी कोल्हापूर डाकघर येथे आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, फोटो व अन्य संबंधित दस्तावेजासह उपस्थित रहावे, असे अवाहन कोल्हापूर डाक विभागाचे प्रवर अधीक्षक ए. व्ही. इंगळे यांनी केले आहे.

टपाल जीवन विमाकरिता उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष पुर्ण असावे कमाल वयाची कोणतीही अट नाही. उमेदवार १० वी पास, मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. इच्छुक उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव संगणकाचे ज्ञान व स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असणे अपेक्षित आहे.