सांगोला विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांचा पवार कुटुंबीयांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी बोलताना आमदार बाबासाहेब देशमुख म्हणाले आमदार म्हणुन माझी सांगोला विधानसभा मतदार संघातील लोकांनी निवड केली माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी कदापिही तडा जाऊ देणार नाही. माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे. मतादर संघातील व मतदार संघाबाहेरील कित्येकांनी सहकार्य केल्याने मी आज आमदार म्हणुन तुमच्या समोर उभा आहे. कित्येक कुटुंबानी माझ्या साठी जिवाचे रान करुन निवडणुकीत भाग घेऊन वेगवेगळ्या पातळीवर काम केले आहे सहकार्य केले आहे असेच काम व सहकार्य या पवार कुटुबीयांनी सुध्दा केले असल्याचे मत आमदार साहेबांनी व्यक्त केले.
सत्कार समारंभ कार्यक्रमास माजी मार्केट कामिटी चेअरमन गिरीशभाई गंगथडे सरपंच राणी रमेश पवार, सदस्य- सीताराम शेळके, प्रकाश पवार, रमेश पवार, सिद्धेश्वर पवार, अण्णासाहेब पवार, अमोल पवार, पांडुरंग पवार, अतुल पवार, बंडू पवार, लक्ष्मण पवार, प्रणिल पवार, बाळू पवार, तानाजी माळी, औदुंबर माळी, अतुल लवटे चंद्रकांत पवार, रणजित पवार, स्वप्निल पवार ओमराज पवार यांच्या सहित मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित असल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.