नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे ही मेगा भरती असून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावा. विशेष म्हणजे ही मोठी बंपर भरती आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. युनायटेड इंडिया इन्शुरन्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी आहे.
ही भरती प्रक्रिया असिस्टेंट या पदांसाठी सुरू आहे. विशेष म्हणजे पदवीधरांसाठी ही सुवर्णसंधीच आहे. पदवीधर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी आणि या भरती प्रक्रियेबद्दलच्या माहितीसाठी तुम्ही uiic.co.in साईटवर जाऊन भेट द्या.
uiic.co.in साईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. अजिबातच वेळ वाया न घालता उमेदवारांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. 6 जानेवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांनी त्यापूर्वीच आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. त्यानंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.
16 डिसेंबर 2023 म्हणजेच आजपासून या भरती प्रक्रियेला अर्ज करण्यास सुरूवात झालीये. ही भरती प्रक्रिया एकून 300 जागांसाठी पार पडत आहे. म्हणून या भरतीला थेट मेगा भरती म्हटले गेले आहे. उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी हा दिला आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 21 ते 30 पर्यंत असणे आवश्यक आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांची सर्वात अगोदर परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला 1000 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज दाखल करावे लागणार आहेत.