सांगोला तालुक्यातील सर्वच नद्यांवरील वाळू उपसा रोखण्यासाठी पोलिसांची पथके रात्रंदिवस कार्यरत करण्यात आली आहेत. वाळू तस्करांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. वाळू तस्करी करणाऱ्या वाहनांवर व वाळू तस्करांवर कारवाई करण्याची पोलिसांची यंत्रणा सज्ज झाली आहे. मध्यरात्री वाळू तस्करी करणाऱ्या दोन वाहनांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून आळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. गणेश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक माहूरकर यांनी कारवाई करून दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर दोन वाहने जप्त केलेली आहेत.
तरी दि.३१ जानेवारी २०२५ रोजी १२ / १० वा. सुमारास अकोला या गावचे शिवारातील माण नदीपात्रातुन एक निळ्या रंगाचा विना नंबरचा ४०७ टॅम्पो त्या वरील चालक सुशील संजीव शिंदे रा. अकोला ता. सांगोला व टाटा इंद्र त्याचा रजिस्टर नं चक-४५ – ६४७० वरील चालक सुयश संजय गायकवाड वय- २० वर्षे रा. कडलास ता. सांगोला यांनी वरील दोन्ही वाहनामध्ये प्रत्यकी अंदाजे एक ब्रास वाळु ही बेकायदेशीररित्या शासनाच रॉयलटी न भरता स्वतःचे फायद्याकरिता विक्री करण्याचे उद्देशाने चोरुन वाहतुक करीत आसताना सापडले आहेत. त्यांचे विरुध्द बी. एन. एस. कलम ३०३ (२) पर्यावरण कायदा कलम ९, १५ प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वाळू तस्करांवर कारवाई सुरू केल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.