सोलापूर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री जयकुमार गोरे कसे असतील, स्वभाव कसा आहे, कामकाजाची कशी पध्दत आहे हे आजपर्यंत अधिकाऱ्यांना ऐकीव माहिती होती. परंतु नुकतेच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत पालकमंत्री गोरे यांच्या कामाची डॅशिंग पध्दत पाहून कामचुकार अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. पालकमंत्री गोरे यांनी विशेषतः जे चांगले काम करणारे अधिकारी आहे त्यांना फैलाव घेतले नाही. परंतु जे कामचुकार आणि प्रशासनाची दिशाभूल करतात व सर्वसामान्य नागरिकांच्या कामाची अडवणूक करतात अशा अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
विशेषतः जिल्ह्यात जी बेकायदेशीर पध्दतीने तस्करी होणारी वाळूबाबत पालकमंत्री गोरे यांनी कडक भूमिका घेतली आहे. वाळू तस्करीला अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. याबरोबरच आरोग्य विभागातील कामाच्या वर्क ऑर्डर जिल्हा नियोजन समितीची मान्यता न घेताच झाल्याच्या बाबतीत कडक भूमिका घेतली आहे. एकदंरत शासनाने जे सर्वसामान्य नागरिकाला केंद्र बिंदू मानून कामकाज करीत आहे त्याचा प्रत्यय पालकमंत्री यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दाखवून दिले. सर्वसामान्य नागरिकांचे कामे झाले पाहिजे, त्यासाठी जे कामचुकार अधिकारी आहे त्यांना फैलावर घेण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना एकाच कामासाठी हेलपाटे मारायला लावणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा पालकमंत्री गोरे यांनी दिल्याने चांगलीच झोप उडाली आहे.