नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते गरीब मुलींना होणार  लॅपटॉप वाटप

अनेक भागात शिक्षणाच्या बाबतीत अनेक योजना राबविल्या जात आहेत. जेणेकरून शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. सध्या मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. सध्या उच्च शिक्षणात ग्रामीण भागातील काहीं मुली आघाडीवर आहेत त्यांना बीसी एस इंजिनिअर चे शिक्षण घेणाऱ्या मुलींना लॅपटॉप ची गरज असते परंतु पालकांच्या आर्थिक अडचणीमुळे त्यांना लॅपटॉप मिळत नाही .

क्राफ्ट्सआमला प्रकल्पांतर्गत अस्तित्व या संस्थेच्या वतीने आज सांगोला येथील महात्मा फुले सभागृहात सांगोला तालुक्यातील उच्चशिक्षण घेणाऱ्या निवडक गरीब व गरजू मुलींना लॅपटॉप चे वाटप सांगोल्याचे नूतन आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार असुन या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड भूषविणार आहेत तसेच प्रमूख अतिथी म्हणून सहारा इन्स्टिट्यूट च्या चेअरमन डॉ श्रद्धा जवंजाळ या उपस्थित रहाणार आहेत.

म्हणून अशा निवडक गरजू १४ मुलींना क्राफ्ट्स आमला प्रकल्पांतर्गत लेनोवो कंपनीचे चांगल्या दर्जाचे लॅपटॉप दिले जाणार आहेत त्याचा उपयोग मुलींच्या पुढील शिक्षणासाठी होणार असल्याचे मत शहाजी गडहिरे यांनी व्यक्त केले आहे.