इचलकरंजी शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गटारी तुंबल्या आहेत.मुळे डासांचा प्रार्दुभावही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या तुंबलेल्या गटारी स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. इचलकरंजी शहरात मोठ्या प्रमाणात गटारींची संख्या आहे. वारंवार जरी गटारींचा उपसा केला तरीही गटारी तुंबण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. महापालिकेकडून अनेक कर्मचारी गटारींची स्वच्छता करत असतात. तरीसुध्दा गटारी तुंबण्याची संख्याही मोठी आहे. यामुळे अनेकवेळा पाणी रस्त्यावर येवून दुर्गंधी पसरते. याचा मोठा त्रास नागरिकांना होत असून डासांचा प्रार्दुभावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या गटारींची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
इचलकरंजी शहरात तुंबलेल्या गटारी स्वच्छ करण्याची मागणी
