गेल्या आठ दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भोगावती नदीसह पंचगंगा नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. त्यामुळे तब्बल आठ ते दहा फुटांनी पाणी पातळी वाढली आणि जुना पुल पाण्याखाली गेला. बुधवारी पावसाने काहीशी उसंत घेतली. त्यामुळे सध्या पंचगंगेची पाणी पातळी स्थिरावली आहे. त्यामुळे गावभागसह नदीवेस भागातील नागरीकांना मी काहीसा दिलासा मिळालेला आहे.