आष्टा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर आष्टा नगरपरिषदेने बाबासाहेबांच्या नावाचा चबुतरा बांधला आहे. तो गेले कित्येक दिवस घाणीच्या व धुळीच्या विळख्यात होता. या मार्गावरून आष्टा पालिकेची पाण्याची गाडी, स्वच्छता कर्मचारी, अधिकारी ये जा करीत असतात. पण ही दुरवस्था पाहून कोणालाही आष्टा विनय कांबळे यांना मागणीची पूर्तता करण्याच्या स्वच्छतेचे गांभीर्य कळले नाही. कित्येक वेळा विनय कांबळे, साजन अवघडे, मानसिंग विरभक्त, राहुल वाडकर, संदीप कुडचिकर यांनी हा परिसर स्वच्छ केला.स्वच्छतेबाबत वेळोवेळी नगरपालिका प्रशासन व स्वच्छता ठेकेदार यांना सांगून देखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
२६ जानेवारी रोजी चबुतरा समोर कुत्र्यांनी घाण केली होती नगरपालिकेला जाब नगरपालिकेला जाब विचारल्यानंतर तासाने त्यांना जाग आली तोपर्यंत विनय कांबळे व सहकाऱ्यांनी तेथील स्वच्छता करून फलकाला हार अर्पण करून घटनेचा निषेध म्हणून नगरपालिकेच्या दारात उपोषणास सुरु केले. घटनेचे गांभीर्य ओळखून व या उपोषणाची दखल घेत पालिकेचे स्वच्छता निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी नामफलक स्वच्छता कामी कर्मचारी नेमणूक करून स्वच्छता जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही करण्याचे लेखी पत्र विनय कांबळे यांना दिले. यानंतर सदर उपोषण मागे घेण्यात आले.