अमृतसरमधील घटनेसंदर्भात इस्लामपुरात विविध पक्ष, संघटना आक्रमक; डॉ. आंबेडकर पुतळा विटंबनेचा निषेध

पंजाबमधील अमृतसर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ इस्लामपुरात विविध पुरोगामी पक्ष व संघटनांच्यावतीने निषेध करण्यात आला. याबाबतचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले. भारतीय संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू असताना भारतीय घटनेच्या शिल्पकाराच्या पुतळ्याची विटंबना होणे अतिशय निंदनीय आहे.

याचा निषेध करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जोरदार घोषण करण्यात आली. याप्रसंगी जेष्ठ नेते शरद कांबळे, कॉग्रेड दिग्विजय पाटील, शिक्षक संघटनेचे सुनिल कांबळे, आरपीआयचे सुधीर कांबळे, आम आदमी पार्टीचे गजानन पाटील, शिवसेना उपाठाचे शकील सय्यद, सुशील सावंत, बीएसपीचे अमोल कांबळे, डिपीआयचे नंदकुमार नांगरे, संभाजी ब्रिगेडचे उमेश शेवाळे, दलित महासंघाचे शंकर महापुरे, प्रा. मिलिंद खंडेलोटे, प्रा. सचिन गरूड, समता सैनिक दलाचे राजेंद्र पवार, मिलिंद माने, राजू कांबळे, संजय भोसले, रमेश कांबळे, अजित हवलदार पिराजी थोरवडे, कुणाल कामत, यशवंत धुमाळे, प्रविण कांबळे, अॅड. मनोज राजवर्धन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.