इस्लामपूर जुगार अड्डयावर छापा….

भवानीनगर तालुका वाळवा येथे बेकायदा मटका-जुगार घेणाऱ्या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ हजार ३६० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.आनंदा मारुती माळी असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. माळी हा भवानीनगर येथील एका पानटपरीच्या बाजूला थांबून बेकायदेशीरपणे मटका घेत होता. त्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. पोलिस शिपाई विशाल पांगे यांनी फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संदेशा यादव अधिक तपास करीत आहेत.