आष्टा येथील भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. सर्वानुमते यावर्षीची पाणीपट्टी एकरी नऊ हजार पाचशे रुपये करण्याचा निर्णय झाला. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक विराज शिंदे यांनी संस्थेचा सभासद मयत झाल्यास त्याच्या वारसांना तात्काळ दहा हजार रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा केली.
राजारामबापू पाटील कारखाना इरिगेशन कमिटीचे चेअरमन प्रदीप कुमार पाटील, इरिगेशन अधिकारी जे. बी. पाटील, संतोष जंगम, राजारामबापू कारखान्याचे संचालक बबनराव थोटे, चेअरमन अनिल शिंदे हे प्रमुख उपस्थित होते. विराज शिंदे म्हणाले, संस्थेच्या ठेवी ७ कोटी ८ लाख, वसुली ९७ टक्के झाली असून सभासदांना १० टक्के लाभांश देण्यात येणार आहे. संचालक मंडळ आणि कर्मचारी प्रामाणिकपणे काम करीत आहेत. यामुळे संस्थेची झपाट्याने प्रगती होत आहे. संस्थेचे अध्यक्ष अनिल आनंदराव शिंदे यांनी अहवाल वाचन तर सचिव प्रकाश माळी यांनी नोटीस वाचन केले. यावेळी उपाध्यक्ष मंगल झीनगे, रामचंद्र सिद्ध, नितीन झंवर, शिवाजीराव शिंदे, किरण काळोखे, तुकाराम नायकवडी, राजमती मालगावे, नजरुद्दीन मुजावर, हरीश भंडारे यांच्यासह संचालक, सभासद कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
