मध्यमवर्गीय, शेतकरी आणि उद्योजकांना दिलासा : आ. सुधीर गाडगीळ

देशातील मध्यमवर्गीय, शेतकरी, कामगार आणि उद्योग क्षेत्राला दिलासा देणारा प्रोत्साहन देणारा आणि गुंतवणुकीस चालना देणारा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन एक मोठा दिलासा मध्यमवर्गाला त्यांनी दिला आहे. शेतकरी आणि शेती विकासासाठी विविध योजना जाहीर केल्यामुळे ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा आणि नागरिक केंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे. मध्यमवर्गीय, पगारदार, युवक आणि शेतकरी तसेच कष्टकरी या सगळ्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात दिलासा देण्यात आला आहे.

या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे जिल्हा आणि तालुका पातळीवरील उद्योग वाढीस प्रोत्साहन मिळणार आहे. प्राप्तीकराची मर्यादा वाढविल्याने तो पैसा अर्थव्यवस्थेत येईल. त्यामुळे मागणी वाढेल. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठीही महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. देशा- तील शंभर जिल्ह्यांसाठी विशेष प्रोत्साहन योजना, तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन, यात शंभर टक्के माल खरेदीचे धोरण यामुळे शेतकऱ्यांसाठी एक मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. स्टार्टअप साठी २० कोटी रुपयांची कर्ज मर्यादा वाढवण्याचा निर्णय रोजगार वाढीला चालना देणार आहे.