गेल्या काही दिवसांपासून बॉलिवुडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि नॅशनल क्रश म्हणून ओळख असलेली रश्मिका मंदाना यांच्या सिकंदर या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. हा चित्रपट येत्या 28 मार्च रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे आतापासूनच जोरदार प्रमोशन केले जात आहे. असे असतानचा आता सलमान खान आणि रश्मिक मंदाना हे दोघेही आणखी एका नव्या चित्रपटात दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे दिग्गज दिग्दर्शक अटली हा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांच्या फॅन्ससाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते ‘A6’ या चित्रपटात एकत्र दिसण्याची शक्यता आहे.
सिकंदर या चित्रपटात या दोघेही कपल म्हणून दिसणार आहेत. म्हणजेच या दोघांमध्ये रोमँटिक रिलेशन या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. असे असतानाच आता ही जोडी पुन्हा एकदा ‘A6’ या चित्रपटात एकत्र दिसू शकते. तशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रश्मिका मंदानाने पुष्पा-2 या चित्रपटात केलेला अभिनय सलमान खान आणि अटली या दोघांनाही पसंद पडल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच पुन्हा एकदा सलमान खानसोबत रश्मिका दिसणार आहे, असे म्हटले जात आहे.
गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात अटलीने सलमान खानसोबतच्या नव्या चित्रपटाबाबत माहिती दिली होती. या चित्रपटात सलमान खान प्रमुख नायकाच्या भूमिकेत असेल, असे तेव्हा अटलीलने सांगितले होते. याच चित्रपटाचे नाव ‘A6’ असे असून लवकरच त्यावर काम चालू होईल, असे सांगितले आहे. रश्मिका मंदानाचा छावा नावाचा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात तिने अभिनेता विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर केलेली आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. रश्मिका सध्या याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.दरम्यान, सलमान आणि रश्मिका यांच्या सिकंदर या चित्रपटाचेही टिझर गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेले आहे. या चित्रपटात सलमान खान डॅशिंग लुकमध्ये दिसतोय. याच चित्रपटात रश्मिका मंदानासुद्धा दिसेल. त्यामुळे हा चित्रपट काय कमाल करून दाखवणार, याकडे सर्वांचेच लागले आहे.