सध्या गुन्हेगारी प्रकरणात भरमसाठ वाढ झालेली आहे. पावलोपावली फसवणुकीबाबतीत भीती निर्माण होते. अलीकडे अवैध धंदे देखील राजेरोसपणे सुरु आहेत. अशातच आटपाडीत अवैध वाळू वाहतूक जोमात सुरु आहे. आटपाडी तहसील कार्यालयाकडून आटपाडी तालुक्यांमध्ये वाळू वाहतूक करीत असताना दोन वाहनावर कडक कारवाई करण्यात आली. यामध्ये दिनांक ०५/०२/२०२५ व दिनांक ०६/०२/२०२५ रोजी मा. महसूल मंत्री यांच्या आढावा बैठकीत दिलेलय सुचणेप्रमाणे व मा. जिल्हाधिकारी सो सांगली यांच्या निर्देशानुसार
मा. उपविभागीय अधिकारी विटा श्री. डॉ विक्रम. बांदल व तहसिलदार आटपाडी श्री सागर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिल कार्यालय आटपाडीकडील नियुक्त पथक ग्राम महसूल अधिकारी श्री विनायक बालटे ग्राम महसूल अधिकारी श्री शेषराव मुंडे श्री ग्राम महसूल अधिकारी श्री विनायक पाटील, ग्राम महसूल अधिकारी श्री विनायक पाटील, नितीन नाईक महसूल सेवक गोरख जावीर यांनी रात्री गस्त घालून एक ट्रक्टर व एक पिक अप टॅम्पो पकडून दोन्ही वाहने पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आली आहेत.
ही कारवाई निंबवडे व दिघंची येथील परिसरामध्ये करण्यात आली. निंबवडे येथे वाळू वाहतूक करणारे वाहन पकडून तहसिलदार स्वतः व ग्राम महसूल अधिकारी श्री विनायक बालटे यांच्या समवेत ट्रॅक्टर वर बसून आले होते. त्यावेळी पथकामध्ये फक्त दोघेच असताना हि कारवाई करण्यात आली. व दिघंची येथे दिनांक ०६/०२/२०२५ रोजी रात्री १ ते पहाटे ३ वाजेपर्यंत तहसिलदार स्वतः पथकासोबत होते. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) व खाण (विकास व विनियमन) अधिनियम १९५७ मधील कलम ७८ व दि. १२ जानेवारी २०१८ चे महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक १८ नुसार दंडनीय कारवाई ची नोटीस देणेत आली आहे.
आटपाडी तहसिलदार श्री सागर ढवळे सोमवारी ०३/०२/२०२५ रोजी दोन महिन्याच्या रजेवरून हजर झाल्यापासून ही सलग दुसरी कारवाई आहे. त्यामुळे वाळू चोरी व अवैध वाहतूकीवर कारवाई होत असलेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यापुढेही वाळू चोरी व अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई ल जाणार असल्याचे तहसिलदार श्री सागर ढवळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.