मा. सुहास बाबर यांचा झंझावत! आटपाडी येथे संवाद दौरा……

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना प्रत्येक मतदार संघामध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे मतदारसंघांमध्ये इच्छुक नेते मंडळींनी आपला दौरा सुरू केलेला आहे. निवडणूक रंगात आलेली असताना आता सुहास बाबर यांनी आटपाडी येथे संवाद दौरा सुरू केला आहे. सुहास बाबर यांच्याबरोबर तानाजी पाटील हे मोठ्या ताकदीने सहभागी आहेत. आटपाडी तालुक्यातील माडगुळे, निंबवडे, वाक्षेवाडी, मुळेवाडी, गळवेवाडी, दिघंची, विठलापूर उंबरगाव, राजेवाडी सर्व गावांना भेटी देऊन त्यांच्या अडीअडचणी त्यांनी जाणून घेतल्या.

भविष्यात विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. सुहास बाबर यांच्याबरोबर तानाजी पाटील सरपंच अमोल मोळे,आटपाडी तालुका संजय गांधी योजना अध्यक्ष नितीन यांच्यासह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.