इचलकरंजी येथील हजरत चाँदसाहेब वली दर्गा उरुस उत्साहात

इचलकरंजी येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या येथील बंगला रोडवरील हजरत चाँदसाहेब वली दर्गा उरुस मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. इचलकरंजी शहरातील बंगला रोडवर हजर चाँदसाहेब वली यांचा दर्गा असून दरवर्षी मोठ्या उत्साहात उरुस साजरा केला जातो. त्याचबरोबर याठिकाणी मोहरम सणसुध्दा साजरा होतो. यंदा बुधवारी रात्री गंध लेपन करण्यात आले. तर गुरुवारी उरुसाचा मुख्य दिवस होता. दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. शनिवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. उरुस व सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी सिकंदर मुजावर, गौस मुजावर, सुबहान सलीम मुजावर, शोएब मुजावर यांनी परिश्रम घेतले.