इचलकरंजीत मोठे तळे सुशोभिकरणाचे काम ठप्प

निधी अभावीमुळे कामकाजावर परिणाम मोठे तळे येथील सुशोभिकरणाचे काम गेल्या महिन्याभरापासून ठप्प आहे. संबंधित मक्तेदाराला बिल अदा केले नसल्यामुळे निधी अभावी मक्तेदाराने काम बंद ठेवले आहे. अमृत – २ योजनेमधून मंजूर झालेल्या या सुशोभिकरणाचे काम राज्य व केंद्राकडून निधी आला – नसल्यामुळे काम बंद आहे. तेव्हा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे.येथील मोठे तळे परिसरात असलेल्या संस्थानकालीन पाण्याच्या तळ्याला मोठी दुर्दशा प्राप्त झाली होती. या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याने या भागाला विद्रुपीकरण प्राप्त झाले होते. महानगरपालिकेच्यावतीने तळ्यातील कचरा काढण्याचे काम हाती घेतले होते.

त्यानंतर सदर तळ्याच्या सुशोभिकरणासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. शासनाने अमृत – २ योजनेतून २ कोटी ८४ लाख रुपये खर्चाच्या योजनेला मंजूरी दिली होती. यामध्ये फरक दिल निधी अभावी गेल्या महिन्याभरापासून मोठे तळे सुशोभिकरणाचे काम ठप्प आहे. मोठे तळे येथे सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. मात्र हे काम निधी अभावी रखडले आहे त्यामुळे शहरवासियांतून नाराजी पसरली आहे.

तेव्हा शहराच्या सादर्याच्या कामामध्ये निधी कमी पडू नये याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.मोठ्या तळ्याचे सुशोभिकरणाबरोबर धबधबा, लाईट सिस्टीम, साऊंड सिस्टीम, वृध्दांसाठी सहवास कट्टा, बालचमूंसाठी बगीचा आदी सुविधा करण्यात येणार आहेत. सदरचे काम मंजूर झालेल्या मक्तेदाराने सुशोभिकरणाचे काम जोमाने सुरू करण्यात आले होते. गेल्या सात महिन्यांमध्ये पायाभूत ६० ते ७० टक्के काम पूर्ण झाले असून मक्तेदाराने तब्बल ६० ते ७० लाख रुपये खर्च केले आहेत. मात्र या खर्चापोटी महापालिकेकडून अद्याप बिलापोटी निधी मिळाला नाही. त्यामुळे संबंधित मक्तेदाराने गेल्या महिन्याभरापासून काम बंद ठेवले आहे. केंद्र व राज्य स्तराकडून मंजूर निधी मिळावा यासाठी आयुक्तांसह बांधकाम विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. मात्र, निधी मिळविण्यात अद्याप यश आले नाही. त्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे.