भाजपातच ३२-३२ जागांचा फॉर्म्युला : महायुतीचे काय ?

इचलकरंजी, महायुतीचे काय होणार? हा प्रश्न सध्या अनुत्तरीत असतानाच भाजपाने इचलकरंजीत महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवून घेतले जात आहेत. यामध्ये आवाडे आणि हाळवणकर गटाला प्रत्येकी ३२-३२ जागांचा फॉर्म्युला निश्चित आहे. तथापि महायुती झाल्यास ही संख्या कमी होणार आहे. याबाबत सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे निर्णय घेणार असल्याचे समजते.

 राज्यात एकीकडे सर्वच पक्षाचे वरीष्ठ नेते महायुतीच्या माध्यमातून महापालिका निवडणुका लढविण्याचे भाष्य करत आहेत.त्याचबरोबर दुसरीकडे काही नेते ज्या ठिकाणी पक्षाची ताकद असेल तेथे स्वबळावर लढण्याचे संकेत दिले जात आहेत. त्यानुसार इचलकरंजी शहरात भाजपाने सुरुवातीपासूनच महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. इचलकरंजीत महानगरपालिकेची प्रभाग रचना निश्चित झाल्यामुळे निवडणूक कामकाजाला गती मिळताना दिसत आहे. अनेक इच्छुक तयारीला लागले आहेत. दरम्यान ६५ प्रभागातून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवून घेतले जात आहेत.
  
 यामाध्यमातून आवश्यक ती माहिती न घेतली जात आहे. ही सर्व माहिती एकत्र करून यावर मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे ) निर्णय घेणार आहेत. या अर्जामध्ये न संबंधितांकडून कोणत्या प्रभागातून निवडणूक तू लढविली जाणार, यासंबंधी जातीचा आवश्यक दाखला, पक्षासोबत किती वर्षापासून सक्रिय ये आहे तसेच भागात कोणते सामाजिक कार्य र्ट केले आहे यासह अन्य माहितीचा समावेश आहे.

 आवाडे आणि हाळवणकर अशा दोन गटाकडून हे अर्ज भरून घेतले जात आहेत. सदर अर्ज भरल्यानंतर जमा करण्याची मी जबाबदारी अनुभवी पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यातआली आहे. सदर इच्छुक उमेदवारांचे अर्ज आल्यानंतर संबंधित प्रभागात जाऊन याचा सर्व्हे केला जाणार आहे. सर्व्हे केल्यानंतर याबाबत आवाडे- हाळवणकर गटातील प्रत्येकी दोन सदस्यांच्या समन्वयाने उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. त्यानुसार हाळवणकर गटाला ३२ आणि आवाडे गटाला ३२ जागा देण्याचा फॉर्मुला वरिष्ठ पातळीवर ठरला असल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांतून बोलले जात आहे. दरम्यान, महायुती झाल्यास यामध्ये बदल होण्याचेही संकेत मिळत आहेत.

 भाजपाकडून इच्छुक उमेदवारांची माहिती प्राप्त केली जात असली तरी महायुतीमधील अन्य घटक पक्षांचे काय ? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. यामध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) यांना सामावून घेतलेजाणार की भाजपा स्वबळावरच निवडणुकीला सामोरे जाणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार अशोकराव जांभळे यांचे शहापूर, गणेशनगर, जवाहरनगर भागात मोठी ताकद आहे. याशिवाय शिवसेना शिंदे गट देखील अनेक भागात प्राबल्य टिकवून आहे. यामुळे जांभळे आणि रवींद्र माने यांना सोबत घेतल्यास महायुती बळकट होईल ? अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची आहे. मात्र स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहता आवाडे आणि हाळवणकर यांचेकडून स्वबळालाच प्राधान्य देऊन जोरदार तयारी केली जात आहे. यदाकदाची वरीष्ठ पातळीवरून युतीचे संकेत मिळालेच तर जागा वाटपाचे गणितही बदलणार आहे.