तुम्हाला लेमन टी प्यायलं आवडतं का? जाणून घ्या आरोग्याच्या दृष्टीने काय होतात फायदे

पाणी, लिंबाचा रस, मध आणि पुदीचा वापरून तयार केलेला लेमन टी आरोग्यवर्धक आहे. यामुळे तणाव कमी होतो आणि मेंदुला चालना मिळते. चिंता, नैराश्य आणि इतर मानसिक समस्या कमी होतात. रोगप्रतिकार शक्ती वाढते. सकाळी नाश्ता केल्यानंतर लेमन टी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होते.

लेमन टी प्यायल्याने मायग्रेनचा त्रास कमी होऊ शकतो. तसेच, जर तुम्हाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर ही चहा पिल्याने थोडा आराम मिळू शकतो. शरीरातील टॉक्सिक लेमन टीमुळे बाहेर पडतात.

लिंबूमधील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. हे शरीरात लोहाची कमतरता दूर करते. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या टाळता येते. हृदयरोगाचा धोका कमी होतो. तसेच पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

लेमन टीमध्ये आलं टाकल्यास त्याचाही फायदा होतो. आले मळमळ होण्याची समस्या दूर करण्यास मदत करते. त्यामुळे स्नायूंचा त्रास कमी होतो. उर्जेची पातळी वाढते. तसेच पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते.

लेमन टीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. कारण त्यात क्रीम किंवा साखर नसते. त्यामुळे जलद वजन कमी करण्यास देखील मदत करते. लिंबूमध्ये सायट्रिक आम्ल असते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. हे मूत्रपिंड आणि यकृत निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.