हसणं म्हणजे खरंच सर्वोत्तम औषध ?

हसण्यामागे केवळ भावनिक नाही तर वैज्ञानिक कारणंही आहेत. हसल्याने शरीरातील स्नायू रिलॅक्स होतात, ताण कमी होतो आणि मेंदूत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तज्ज्ञांच्या मते, दररोज किमान काही मिनिटं मनापासून हसणं हे ध्यानधारणेसारखं फायदेशीर ठरू शकतं. हसणं पचनसंस्थेसाठीही उपयुक्त आहे. हसताना पोटातील स्नायूंना हलकी मालिश मिळते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. शिवाय हसणं फुप्फुसांमध्ये अधिक प्रमाणात ऑक्सिजन घेण्यास मदत करतं, ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते. मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही हसणं खूप महत्त्वाचं आहे. कामाचा ताण, नातेसंबंधातील तणाव किंवा दैनंदिन समस्या यांचा परिणाम कमी करण्यासाठी हसणं हा एक नैसर्गिक उपाय आहे. म्हणूनच अनेक देशांत लाफ्टर थेरपी किंवा हसण्याचा योगा मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. थोडक्यात, हसणं हे फक्त चेहऱ्यावर दिसणारं भाव नाही, तर एक संपूर्ण आरोग्यदायी प्रक्रिया आहे. म्हणून दररोज थोडं का होईना, मनापासून हसा आणि निरोगी राहा !