महाराष्ट्रात शिवसेनेत बंड निर्माण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना अनेक धक्के बसत आहे. आता उद्धव ठाकरे यांचा गड असलेल्या कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्का बसणार आहे. उद्धव ठाकरे गटाचे दोन माजी आमदार करणार शिवसेनेत प्रवेश करणार आहे. माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम करणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. तसेच राजन साळवी 13 फेब्रुवारीला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची निश्चित झाले आहे. या घटनांना शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी ‘ऑपरेशन टायगर’ म्हटले आहे. कोकण शंभर टक्के रिकामे होणार आहे. शिवसेना उबाठाचे कोणीच त्या ठिकाणी राहणार नाही, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, शिंदे साहेबांना लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकऱ्यांची सेवा करण्याचे मान मिळालेला आहे. संजय राऊत यांनी म्हटले होते की, अमित शाह एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन करतील, टायगर ऑपरेशन काही नाही त्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, त्यांचे ऑपरेशन कसे होईल, हे त्यांनासुद्धा माहीत नाही.
कोकणातून अनेक शिवसैनिक, पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत आहे. त्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, शिवसेना उबाठा आता कोकणात नावालाही राहणार नाही. पूर्ण कोकण १००% खाली होणार आहे. ऑपरेशन टायगर आता मार्गी लागलेला आहे. अनेक जिल्ह्यात शिंदे यांच्या शिवसेनेत लोक येत आहे. नांदेडमध्ये बऱ्याच लोकांनी प्रवेश घेतला. शिवसेना कोणाची हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आमचे शिवसैनिक आमच्याकडे आहे. सगळीकडे महाराष्ट्र मध्ये हे चित्र असणार आहे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
दरम्यान राजन साळवी यांच्या प्रवेशावरुन उदय सामंत नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, राजन साळवी यांच्या प्रवेशाबाबत आमचे नेते एकनाथ शिंदे सोबत माझी चर्चा झालेली नाही. आम्ही त्यावर सविस्तर चर्चा करू. ते पक्षात येत असतील तर त्यांच्या काय इच्छा आहेत? काय आकांक्षा आहे? त्याच्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. माझे मोठे बंधू त्या मतदारसंघातून त्यांचा पराभव करून निवडून आलेले आहे. त्यांनाही विश्वासात घेणे गरजेचे आहे.