महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये राहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. सरकारने शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रक्रियेद्वारे शेतकरी ओळखपत्राचा पर्याय दिला आहे, जेणेकरून शेतकरी ही प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करू शकतील. मग आता ही नोंदणी कशी करायची? हेच आपण सविस्तर जाणून घेऊ.
शेतकरी ओळखपत्राचे फायदे काय?
शेतकरी त्यांच्या ओळखपत्राचा वापर करून शेतीशी संबंधित सरकारी योजनांचे लाभ घेऊ शकतात.
शेतकरी या ओळखपत्राद्वारे त्यांच्या शेतीशी संबंधित संसाधनांचा आणि मदतीचा अधिक चांगला वापर करून त्यांचा विकास सुनिश्चित करू शकतात.
हे ओळखपत्र त्यांना अधिकृत डिजिटल ओळख प्रदान करते, ज्यामुळे योजनांचा अर्ज आणि मंजुरी प्रक्रिया सुलभ होते.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक खाते पासबुक
उत्पन्नाचा दाखला
जात प्रमाणपत्र
पत्त्याचा पुरावा
सक्रिय मोबाइल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
सर्व कागदपत्रे स्कॅन करून पोर्टलवर अपलोड करावी लागतील.
पात्रता
सदर अर्जदार हा भारतातील कोणत्याही राज्यातील कायमचा रहिवासी असावा. अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे असावे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
सर्वप्रथम शेतकऱ्याला अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल. जसे महाराष्ट्रात agristack portal चा वापर केला जातो. या पोर्टलवर जाऊन होमपेजवरील “नवीन खाते तयार करा” हा पर्याय निवडा. त्यात आधार क्रमांक टाकून OTP द्वारे पडताळणी करा. पडताळणीनंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल नोंदणी करा. पासवर्ड सेट करा आणि “माझे खाते तयार करा” पर्यायावर क्लिक करा. आता तुमचे खाते यशस्वीरित्या तयार होईल.
नंतर लॉगिन करण्यासाठी “लॉगिन अॅज फार्मर” निवडा. ओटीपी पडताळणीनंतर डॅशबोर्डवर जा. “शेतकरी म्हणून नोंदणी करा” पर्यायावर क्लिक करा. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. “प्रोसीड टू ई-साइन” पर्यायावर क्लिक करा आणि आधार आधारित ई-साइन प्रक्रिया पूर्ण करा. सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एक पावती मिळेल, जी तुम्ही डाउनलोड आणि प्रिंट करू शकता.