खासदार विशाल पाटील यांनी केली जयंतरावांची पाठराखण…..

राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असणाऱ्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांनी राज्याच्या राजकारणात धुरळा उडवून दिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 17 फेब्रुवारी रोजी इस्लामपूर दौऱ्यावर येत आहेत. यामागे राजकीय कारण असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. यावर खासदार विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गडकरी यांच्या दौऱ्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. ते चांगल्या कार्यक्रमांना नेहमी येतात. ते आपल्या कामात भेदाभेद करत नाहीत. पण गडकरी पंतप्रधान होणार असतील तर मराठी माणूस म्हणून आपला पहिला पाठींबा असेल असेही त्यांनी म्हटलं आहे. तर आमदार जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना फाटा दिला आहे.