लाडकी बहीनीच्या पुढच्या नऊ महिन्यांची तरतूद ; अजित पवार

‘लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जमा झाला आहे. आता पुढच्या हप्त्यांची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्र हप्ते येणार आहेत. मात्र त्याबरोबरच पुढच्या नऊ महिन्यांसाठी ३५ हजार कोटींची तरतूद करून ठेवली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना पुढचे नऊ हप्ते मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.