प्रत्येक भागात विविध मनोरंजनात्म्क तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभाग देखील पहायला मिळतो. हातकणंगले तालुक्यातील अलाटवाडी येथील स्वर्गीय पुष्पादेवी मसुरकर सोशल फाऊंडेशनतर्फे पट्टणकोडोली येथील जय लॉनमध्ये महिलांसाठी हळदी-कुंकू व न्यू कॉमेडी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात आरती कडोली यांनी होम मिनिस्टरचा हुमान पटकावून प्रथम क्रमांकाची एलईडी टीव्ही व मानाच्या पैठणीच्या विजेत्या ठरल्या. रेणुका हेळवी यांनी व्दितीय क्रमांक पटकावून मोबाईल व मानाची पैठणी, पूजा हळदे यांनी तृतीय क्रमांक पटकावून होम थिएटर व मानाची पैठणी पटकाविली.
प्रारंभी फाऊंडेशनच्या अध्यक्षा यशश्री मसुरकर यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तत्पूर्वी अंबपच्या लोकनियुक्त सरपंच दिप्ती माने, स्त्री रोग तज्ञ भारती अग्रवाल, केडीसीसी बँकेच्या संचालिका श्रुतिका काटकर, उद्योजिका सोनाली सावंत, माजी उपसरपंच डॉ. कृष्णाजी मसुरकर व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात होम मिनिस्टर फेम नितीन गवळी यांनी उपस्थित महिलांचे मनोरंजन करीत महिलांचे सहभागातून खेळ सादर करत मानाच्या पैठणीसाठी विजेत्या होम मिनिस्टरची निवड करण्यात आली.
याप्रसंगी दिप्ती माने, भारती अग्रवाल, श्रुतिका काटकर, सोनाली सावंत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या भारती अवघडे, रेखा डुम, कांचन जाधव, विमल माने, मंगल जाधव, अश्विनी पिराई, अंजली भोजकर, इंगळीच्या ग्रा.पं.सदस्या स्वप्नाली भातमारे, सरिता मसुरकर, सविता केळूसकर, रेखा पोवार, आणुबाई कदम, पूजा माने, प्रियांका जाधव, वैशाली पोवार, सोनाली दिगडे, पुनम कांबळे, बेबीताई कदम, माधवी सोनवणे,
पूजा जाधव, मेघा माने, शिल्पा जाधव, स्वाती पाटील, वंदना जाधव, ज्योती ताकमारे, शोभा जुगळे, संगिता किर्तीकर, मयुरी माने, धनश्री पाटील, अश्विनी कदम, अस्मिता हळदे, प्रियांका लुमनाक, रुपाली कदम, सारिका कोळी, सविता सुर्यवंशी, वैशाली चव्हाण, पल्लवी मोरे, सविता स्वामी, सावित्री मोरे यांच्यासह महिला उपस्थित होत्या. तेजस्विनी पांचाळ यांनी सूत्रसंचालन केले. सायली मसुरकर यांनी आभार मानले.