मराठा समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडणाऱ्या आमदार राजू आवळे यांना साथ देत त्यांना वडगाव परिसरातून मोठे मताधिक्य देऊया असे आवाहन माजी नगराध्यक्ष, यादव आघाडीच्या नेत्या विद्याताई पोळ यांनी केले. वडगाव येथील यादव आघाडीच्यावतीने आयोजित मराठा समाज मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मराठा समाजाचे माजी अध्यक्ष राजाराम यादव होते. माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, माजी नगरसेवक गुरुप्रसाद यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्याताई पोळ म्हणाल्या, मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना आम्ही माजी मंत्री सतेज पाटील, आमदार राजू आवळे यांना आरक्षणाचा मुद्दा सभागृहात मांडण्याची सूचना केली होती.
समाजाचे प्रलंबित प्रश्न, दाखले, मराठा भवन यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. भविष्यातदेखील मराठा समाजासाठी ते सहकार्य करतील असा शब्द त्यांनी आपल्याला दिलेला आहे. अखिल भारतीय मराठा समाज संघटनेचे वडगाव शहराध्यक्ष संजय शिंदे म्हणाले, मराठा समाजाला कायमस्वरुपी आरक्षण मिळावे यासाठी आमदार आवळे यांनी सभागृहात पाठपुरावा करावा.
सुनीता चव्हाण म्हणाल्या, विद्याताई पोळ यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे उमेदवार राजू आवळे यांना वडगाव शहरातून मोठे मताधिक्य देणार आहे.