उद्या सोमवारी ८ जुलैला मोहरम साजरा केला जाणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर पेठवडगाव येथे पोलीस ठाण्यात बैठक संपन्न झाली. वडगांव पोलीस ठाणे हद्दीमधील मोहरम सण साजरा करणारे कमिटी अध्यक्ष व पदाधिकारी यांची वडगांव पोलीस ठाणे येथे बैठक घेण्यात आली. मोहरम सण शांततेत पूर्ण करणे, पिर पंजे, ताबूत ठिकाणी २४ तास, एक व्यक्ती राहील याची दक्षता घ्यावी.
पीर विसर्जन शांततेत व पारंपारिक पद्धतीने करावे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. मोहरम सनानिमित्त कोणीही आक्षेपार्ह पोस्टर अथवा स्टेटस लावणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पिर पंजे बसवण्याकरता उभारण्यात येणाऱ्या मंडपाचा वाहतुकीस अडथळा होणार नाही. मंडपामध्ये बेकायदेशीर लाईट कनेक्शन घेण्यात येऊ नये असे आवाहन वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी केले.