सध्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न खूपच गंभीर बनत चाललेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोल्हापूरच्या चंदगडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोम बाधित एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.चंदगड तालुक्यातील साठ वर्षीय महिलेचा सीपीआरमध्ये जीबीएसने मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या जिल्ह्यात जीबीएसचा हा पहिलाच मृत्यू असल्याचे सांगितलं जातंय. तर या महिलेवर गेल्या काही दिवसांपासून चंदगडच्या सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. राज्यात एकीकडे गुलेन बॅरी सिंड्रोमचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असताना दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या जिल्ह्यात जीबीएसच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यूने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
लक्षणे-
अचानक पायातील किंवा हातात येणारा अशक्तपणा / दुर्बलता / लकवा
अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा अशक्तपणा
जास्त दिवसांचा अतिसार (डायरिया) आणि ताप
घ्यावयाची काळजी
- पिण्याचे पाणी उकळून प्यावे
- स्वच्छ व ताजे अन्न खावे
- शिजलेले अन्न आणि न शिजलेले कच्चे अन्न एकत्रित ठेऊ नये
- वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा
- हात किंवा पायांमध्ये अचानक वाढत जाणारा अशक्तपणा असल्यास त्वरित जवळच्या महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधावा.