एका नव्या संशोधनात कॅनडाच्या व्हॅन्कोअर येथे लवकरच महासुनामी येण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. यापूर्वीच्या सुनामीने जगभरातील विविध ठिकाणी बराच प्रलय माजवला होता.त्यातुलनेत ही सुनामी किती उपद्रवकारक ठरू शकते, यावर सध्या अधिक संशोधन सुरू आहे.यंदाचे वर्ष आता शेवटच्या टप्प्यात आहे. या वर्षाने कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. साहजिकच, 2024 कडून आपल्या सर्वांना बर्याच अपेक्षा असणार आहेत. त्यातुलनेत नव्या वर्षात सुनामीसारखी प्रलये त्रासदायी ठरू नयेत, याद़ृष्टीने आतापासूनच उपाययोजना राबवण्यावर भर दिला जात आहे.
या नव्या संशोधनात कॅनडातील व्हॅन्कोअर येथे टेक्टोनिक प्लेटस् भिडल्याने महासुनामी निर्माण होण्याची शक्यता सध्या चर्चेत आहे. मात्र, या ठिकाणी येथे यापूर्वीही असे घडले आहे. आता नव्याने महासुनामी आल्यास जगभरात 4 लाख लोकांचा बळी जाण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी उपाययोजना राबवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ही महासुनामी जेेथे येणे शक्य आहे, त्या भागाला ‘एक्सएलईएफ’ या नावाने ओळखले जाते.
ही फॉल्ट लाईन 45 मैलांपर्यंत आहे.कॅनडाशिवाय, अन्य काही भागांतही या सुनामीमुळे मोठे नुकसान होऊ शकेल, असा अंदाज आहे. ही महासुनामी येण्यासाठी या भागात 6.1 ते 7.6 रिश्टर स्केल भूकंप होणे हा निकष असेल. असा भूकंप झाला तरच ही महासुनामी येईल, असे या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य हानी टाळण्यासाठी संशोधनावर भर दिला जात आहे.