राज्यात तीन दिवस यलो अलर्ट……

राज्यातील शेतकऱ्यांपुढील संकट कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. रब्बी हंगाम काढण्याची वेळ असताना अवकाळी पावसाचे संकट आले आहे. राज्यात तीन दिवस यलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत येणार आहे. रब्बी हंगाम काढणीची वेळ आली असताना गारपीट आणि पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने आजपासून तीन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे.

नागपूरसह परिसरात आज वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. नागपूरला आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज आहे.

राज्यातील अनेक भागांत थंडीत अचानक वाढ झाली आहे. तसेच पारा सरीसरीपेक्षा २ ते ४ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.२६ फेब्रुवारी रोजी नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यास यलो अलर्ट दिला आहे. नागपूरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. २७ फेब्रुवारी रोजी वर्धा, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. वाशिम, अकोला, यवतामाळ, बुलढाणा, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यास यलो अलर्ट २७ फेब्रुवारी रोजी दिला आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे.