मद्यपींसाठी खुशखबर! आता या ब्रँडची दारू मिळणार तब्बल 50 टक्क्यांनी स्वस्त…..

भारत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. बॉर्बन व्हिस्कीवरील आयात शुल्कामध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. बॉर्बन व्हिस्कीवरील आयात शुल्क तब्बल 50 टक्के कमी केलं आहे.अमेरिकेसोबत व्यापक व्यापार करारावर वाटाघाटी सुरू करण्याच्या योजनेच्या घोषणेदरम्यान, सरकारने हे पाऊल उचललं आहे. 13 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यामध्ये चर्चा झाली.

त्यापूर्वीच बॉबर्न व्हिस्कीवरील आयात शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.केवळ बॉर्बन व्हिस्कीवरील आयात शुल्कामध्येच कपात करण्यात आली आहे, इतर कोणत्याही दारूच्या ब्रँडवरील आयात शुल्कात कपात करण्यात आली नसून, त्यांचे दर जौसे थे राहणार आहेत. त्यांच्यावर शंभर टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. अमेरिका हा भारताचा बॉर्बन व्हिस्कीचा प्रमुख निर्यातदार देश आहे, भारतात जेवढी दारू आयात केली जाते, त्यातील तब्बल 25 टक्के दारू ही एकट्या अमेरिकेमधून आयात होते.

बॉर्बन व्हिस्की हा अमेरिकेतली सर्वात प्रसिद्ध आणि जुना दारूचा ब्रँड आहे. ही व्हिस्की प्रामुख्यानं मक्यापासून बनवली जाते.बॉर्बन व्हिस्कीची टेस्ट ही थोडीसी गोडसर लागते. त्यामुळे अनेकांची ही फेव्हरेट दारू असून, जगभरात तिचा प्रचंड खप आहे. तुम्ही या व्हिस्कीला थेट प्या किंवा कॉकटेल करा मात्र तुम्हाला पुन्हा तोच तो अनुभव मिळतो.याबाबत माहिती देताना सरकारकडून एक अधिसूचना जारी करण्यत आली आहे,

ज्यामध्ये म्हटलं आहे की, बॉर्बन व्हिस्कीवर आता 150 टक्के आयात शुल्क आकारण्याऐवजी केवळ 50 टक्केच आयात शुल्क आकारलं जाणार आहे. भारतानं 2023-24 मध्ये तब्बल 25 लाख डॉलर किमतीची बॉर्बन व्हिस्की अमेरिकेकडून आयात केली होती.अमेरिकेसोबतच, यूएई आणि सिंगापूरमधून देखील ही दारू आयात केली जाते.