हुपरीतील श्री अंबाबाई देवीची यात्रा २० पासून सुरु, विविध कार्यक्रमांचे आयोजन

सध्या अनेक भागातील यात्रा सुरु आहेत. या यात्रेनिमित्त अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील श्री अंबाबाई देवीची यात्रा सुरु होणार आहे. या यात्रेनिमित्त अनेक विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सालाबादप्रमाणे हुपरी येथील श्री अंबाबाई देवीची यात्रा गुरुवारी २० रोजी सुरू होणार आहे. २१ रोजी भर यात्रा असून अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिले आहेत.

२० ते २५ फेब्रुवारी दरम्यान हेडगी यात्रेदरम्यान अनेक करमणुकीचे कार्यक्रम आयोजिले आहेत. शुक्रवारी २१ रोजी एअरगन नेमबाजी स्पर्धेतील खुला महिला व पुरुष गटातील विजयी स्पर्धकांना रोख रक्कम व शिल्ड, बक्षीस देण्यात येणार आहे. रात्री ललकार म्युझिक आर्केस्ट्रा, शनिवारी २२ रोजी दुपारी तीन वाजता महिला व पुरुषांचे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजिले असून अनेक बक्षिसे व यशस्वी मल्लांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यात्रेची जय्यत तयारी करण्यात येत आहे.