कोल्हापूर बोर्डाच्या विभागीय सचिव पदी सुभाष चौगुले यांची नियुक्ती झाली असून आज (१८ डिसेंबर) रोजीपदभार स्वीकारणार आहेत. सुभाष चौगुले हे कोल्हापूरजिल्ह्यातील मळगे खुर्द चे असून प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या मळगे खुर्द येथील प्राथमिक शाळेत झाले.
माध्यमिक शिक्षण मळगे विद्यालय मळगे बु. येथे झाले.देवचंद कॉलेज, अर्जुन नगर बी एस सी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिवाजी विद्यापीठ येथे एम एस सी व आदर्श कॉलेज ऑफ एज्युकेशन पुणे येथे बीएड चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिकमधून एम एड ही पूर्ण केले. सन २०१३ मध्ये एम पी एस सी मार्फत शिक्षणाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली.
२०१८ मे पासून कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालयात सहाय्यक शिक्षण संचालक म्हणून कार्यरत होते. एस. एस. सी.एच.एस.सी. विभागीय बोर्डाचे सचिव म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती झाली असल्याने शिक्षण व सामाजिक संस्था व व्यक्तीकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.