राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत खासदार महाडिक यांनी राष्ट्रपतींना कोल्हापूर भेटीचे आमंत्रण दिले. कोल्हापूर जिल्ह्याची ऐतिहासिक परंपरा, संपन्न वारसा, कला- क्रीडा – कृषी- उद्योग क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी याबद्दल खासदार महाडिक यांनी राष्ट्रपती मुर्मु यांना सविस्तर माहिती दिली. सहकार क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आणि कोल्हापुरी गूळ चप्पल यासह विविध खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी परंपरांची, खासदार महाडिक भागीरथी संस्थेच्या माध्यम यांनी माहिती दिली.
तर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण दिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही अत्यंत आस्थेने महाडिक परिवाराशी संवाद साधला आणि कोल्हापूरच्या इतिहास परंपरांची माहिती जाणून घेतली. यावेळी सौ अरुंधती महाडिक यांनी भागीरथी संस्थेमार्फत सुरू असलेल्या महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांची माहिती दिली.
जिल्ह्यातील सुमारे २० हजार महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी भागीरथी संस्थेच्या माध्यमातून यश आल्याचे सांगितले. त्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद आणि समाधान व्यक्त केला. शासकीय योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यातून महिला आत्मनिर्भर व्हाव्यात, अशी अपेक्षा राष्ट्रपती मुरमु यांनी व्यक्त केली.
दरम्यान महाडिक परिवार आणि समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने राष्ट्रपतींचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी पृथ्वीराज महाडिक, सौ वैष्णवी महाडिक, चिरंजीव अमरेंद्र महाडिक, विश्वराज आणि कृष्णराज महाडिक उपस्थित होते….